Thursday, January 3, 2013

You Have to Win !!!!!!!


This day - That Year

Do you know it was on January 3, 1496, Leonardo da Vinci unsuccessfully tested his flying machine for the first time
केमोथेरेपीची भीती वाटते: मनिषा कोईराला

मुंबई - अभिनेत्री मनिषा कोईराला ही सध्या कर्करोगाशी दोन हात करत आहे. नुकतीच तिच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. परंतु, त्यानंतर केल्या जाणाऱ्या केमोथेरेपीच्या ट्रीटमेंटसाठी मात्र मनिषा घाबरलेल्या अवस्थेत आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा- http://goo.gl/Eghyz

थंडीमुळे दल सरोवर गोठले

श्रीनगर - काश्‍मीरच्या खोऱ्यातील कडाक्‍याची थंडीची लाट अजूनही कायम असल्याने प्रसिद्ध दल सरोवर यंदाच्या मोसमात प्रथमच गोठले आहे. श्रीनगरमध्ये काल (बुधवार) यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. बुधवारी श्रीनगरमध्ये उणे चार अंश तापमान होते.

कारगिलमध्ये पारा आणखी घसरला असून तेथे उणे 16.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. लेहमध्ये उणे 16 अंश तापमान होते. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गुलमर्गमध्ये उणे 9 अंश, तर पहलगाममध्ये उणे 7.8 अंश तापमानाची नोंद झाल्याचे वेधशाळेने सांगितले.

थंडीची ही लाट आणखी काही दिवस राहणार असल्याचेही वेधशाळेने स्पष्ट केले. श्रीनगरमध्ये काल तापमान शून्य अंशाच्याही खाली गेल्याने दल सरोवरासह या भागातील इतर तलावही संपूर्ण गोठले आहेत.
गुगलचे भारताला फास्ट इंटरनेटचे गिफ्ट

बंगळूरु - इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबचा सर्वात जास्त वापर केला जातो. परंतु, भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा स्पीड कमी आहे. त्यामुळे व्हिडिओ बफर होण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागते. हिच बाब लक्षात घेऊन गुगल भारताला फास्ट यू ट्यूबचे गिफ्ट देणार आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा- http://goo.gl/b9ima